जळगाव – कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर नितीन लढ्ढा, बांधकाम व्यावसायीक अनिष शहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या कोरोना काळासह विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली.
जैन उद्योग समूहाव्दारे गरजुंची भोजनाची व्यवस्था असो की, शहरातील कोणतेही समाजपयोगी कार्य असो जैन उद्योग समूह नेहमी अग्रेसर असतो. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या दातृत्व भावनेतुन स्नेहाची शिदोरी हा उपक्रम सुरू असुन आवश्यकता असणाऱ्यांसाठी तो अपेक्षापूर्तीचा ठरत असल्याचे नितीन लढ्ढा म्हणाले. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो मात्र संघर्षाच्या काळात मदतीचा हात देणारे खरे औदार्याचे धनी असतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील यांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना अशोक जैन यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार होत नसल्याने संभाव्य उपासमारीचे गांभीर्य सांगितले त्यानुसार त्यांनी तत्काळ मदतीचा हात दिल्याचे विजय पाटील कृतज्ञतापुर्वक म्हणाले.
या एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मोफत नेत्रतपासणी करण्याची घोषणा यापुर्वीच केली आहे. जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांनी स्नेहाची शिदोरी या उपक्रमाविषयी अवगत करत आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सहकारी यांनी सहकार्य केले.
https://www.youtube.com/watch?v=gM85NxKTyYI