जळगाव – अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीसंदर्भात अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा यांनी त्यांना नियुक्ती झाल्याचे पत्र दिले आहे. अँन्टी करप्शनचे कार्य जोमाने प्रमाणिकपणे करून आपण त्यामाध्यमातून वेगळी उंची फाऊंडेशनची जनमाणसात निर्माण कराल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून पत्राव्दारे व्यक्त केली आहे.
अँन्टी करप्शन विरोधात कार्य करण्याचे संस्थेचे ध्येय असून त्यासाठी संघटनेचा आपल्याला परिपुर्ण पाठिंंबा असणार आहे. अँन्टी करप्शन विरोधातल्या लढाईत कार्य करीत असतांना आपण राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हा, तालुका , ग्रामिण, वार्डस्तरावर राष्ट्रीय एकता, देशाभिमान कायम राखाल असे फांडेशनचे अध्यक्ष अरोरा यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. तसेच प्रशासकीय कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचार मुक्त व्हावे यासाठी आपणाकडून यशस्वी कार्य व्हावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात समान्य नागरीकांना काम करतांना अनेक अडचणी येतात. शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही कामे होत नाही. बहुतांश ठिकाणी पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी नागरीकांच्या अडचणी दूर करण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सूरज नारखेडे यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांची माहिती अधिकार कायदा महासंघाच्या जळगाव सह तालुका प्रचार प्रमुख पदी निवड झाली आहे. जिल्ह्यात विविध क्षेत्रात नागरीकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्नशिल असतात. निवडीबद्दल सुरज नारखेडे यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.
फाऊंडेशनची दिल्लीत आढावा बैठक :-
फाऊंडेशनची जिल्हास्तरीय आढावा बैठक ५ ते ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथें आयोजित केली आहे. या बैठकीत फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष सुरज नारखेडे जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा घेऊन याबाबत सर्व एकत्रित अहवाल दिल्ली येथील बैठकीत मांडणार आहे.
या बैठकीसाठी जळगाव जिल्ह्यातून सुरज नारखेडे यांना आमंत्रित केले आहे. यावेळी ते जळगाव जिल्ह्यात विविध प्रशासनातील काम करतांना येणार्या अडचणीबाबत बैठकीत चर्चा करून अहवाल देणार आहेत.
आणि जिल्ह्यातील भ्रष्टाचार संदर्भात कोणत्याही स्तरावरून नागरिकांना अडचणी आल्या तर याबाबत सुरज नारखेडे 8888991010 यांच्याशी संपर्क साधावा.