यावल प्रतिनीधी – यावल पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकरी निलेश पाटिल यांची चार महिन्या पुर्वी नाशिक येथिल कळवन येथे शासकीय बदली करण्यात आली होती, तेव्हा पासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते.
तेव्हा पासून सहाय्यक गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती केली आहे, मंगळवारी १८जानेवारी रोजी नेहा भोसले यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचे पदभार स्वीकारला नेहा भोसले ह्या आय एएस असून आगामी काळातशासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामिण क्षेत्राचा सर्वागीण विकासाचे लक्ष गाठणे हे आपले प्रमुख लक्ष राहण्याचे हे नेहा भोसले यांनी सांगितले.