मुंबई, वृत्तसंस्था । भिवंडी; एका बंद कपड्याच्या कंपनीत आग लागल्याने धक्कादायक प्रकार . या आगीत कंपनीतील करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला.
भिवंडीत अग्नी तांडव सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास भिवंडी शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागुन कारखान्यातील कपड्यांचा मोठा साठा जळून खाक झाला आहे.या कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत. मात्र दुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
भिवंडी परिसरात वेळोवील आगी या लागतंच असतात, प्रामुख्याने या आगी जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान जास्त लागत असल्याच्या आतापर्यंतच्या पाहणीवरू दिसून आले आहे. त्या मुळे या आगी लागतात का लावल्या जातात हाच प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.
या मुळे ही आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही आग एवढी भीषण आहे की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते. त्यामुळे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.
आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी २ तास लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून आतापर्यत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.