जळगाव – जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, गुप्त माहितीवरून कारवाई करत कुऱ्हा येथे बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला. मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाई बनावट मद्यासह ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुऱ्हा येथे अमोल वानखेडे याच्या घराच्या गच्चीवर बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. संशयित वानखेडे याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार अमोल वसंत भोई (रा. कुऱ्हा) हा देखील यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. छापा टाकल्यानंतर ३७ हजाराच्या मुद्देमालासह संशयित वानखेडेला अटक केली. तर या प्रकरणातील अन्य दोन संशयित पसार आहेत. मंगळवारी पहाटे झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली. संशयिताविरुद्ध कलम ३२८, ४२०, ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस नाईक किरण धनगर, हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, रवींद्र पाटील, नंदलाल पाटील यांनी ही कारवाई केली.


