जळगाव प्रतिनिधी – अमळनेर तरुण पिढीला शिक्षण आणि वाचनाच्या दिशेने नेण्याचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून यामुळे खऱ्या अर्थाने समाज समृद्ध होणार आहे. हजरत बाबा ताज फाउंडेशनने सुरू केलेल्या स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररीचा मुस्लिम समाजातील अधिकाधिक तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले.
हजरत बाबा ताज फाउंडेशन संचालित अल्लामा फजले हक खैराबादी (रहे) स्टडी सेंटर अँड पब्लिक लायबरीचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जळगाव येथील माजी उपमहापौर करीम सालार, महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय नियोजन समितीच्या सदस्या रिता बाविस्कर, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस ऐजाज मलिक, शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, प्रा. अशोक पवार, प्रवीण पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, बन्सीलाल भागवत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, शेतकी संघाचे प्रशासक सदस्य अलिम मुजावर, हाजी मजीद जेकरिया मेमन, अॅड. जुबेर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथालय बांधण्यासाठी देणार एक काेटी रुपये देणार तुम्ही जागेची व्यवस्था करा, ग्रंथालय बांधण्यासाठी मी एक करोड रुपये निधी उपलब्ध करून देईल, असे अाश्वासन या वेळी अामदार पाटील यांनी दिले. गांधलीपुरा परिसरात गरीब नागरिक राहत असल्याने येथील शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीच्या वरील भागात मंगल कार्यालय निर्माण करण्याचे प्रयत्न असल्याचे अामदार म्हणाले. तसेच ग्रंथालयासाठी आमदार निधीतून एक संगणक संच देण्याची घोषणा आमदारांनी या वेळी केली.