पाचोरा – नांद्रा येथील हर्षल संजय तावडे (वय १७) गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाले.
हर्षल यास पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येता येत नव्हते तेव्हा नदी असणाऱ्या नावाडी यांच्या लक्षात येताच त्यांनी आपली नाव हर्षल याच्या कडे नेली. गिरणा नदीला भरपूर पाणी असल्याने हर्षलला शोधणे कठीण झाले होते. त्याला शोधण्यासाठी माहिजी येथील सारंग पवार, दिपक वराडे, तसेच कुरंगी येथील पंकज ठाकरे, नितीन कोळी यांनी खोल पाण्यात जाऊन हर्षलला बाहेर काढले परंतु तोपर्यंत हर्षलचा पाण्यात बुडून मृत झाला होता.