मेष:- धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करा त्यामुळे तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त होणार. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.
वृषभ:- आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे. सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागावे. उगाचच हुरळून जाऊ नका.
मिथुन:- आजचा दिवस ताजातवाना असेल. नवविवाहिताना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल.
कर्क:- विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.
सिंह:- व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल.
कन्या:- जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील.
तूळ:- पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. ओळखीचे लोक भेटतील.
वृश्चिक:- देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल.
धनू:- बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल.
मकर:- प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. नकारात्मकता दूर सारावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल.
कुंभ:- विविध स्तरातून लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल.
मीन:- रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल.