जळगाव : शहरातील बेघर गरीब गरजूंचा थंडीपासून बचाव व्हावा म्हणून युवा प्रेरणा फाऊंडशन व निस्वार्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज मध्यरात्री १२ ते २ या वेळेत शहरातील इच्छादेवी माता मंदिर परिसर, सिंधी कॉलनी , पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, बी. जे. मार्केट परिसर, टॉवर चौक, बस स्टँड या परिसरतील बेघर- गरीब गरजूंना ५० कंबल वाटप करण्यात आले.
यावेळी युवा प्रेरणाचे फाउंडेशनचे विक्की सोनार, निःस्वार्थ सेवा फाउंडेशनचे गिरीश शिरसाळे, दीपक सपके , सुमित भावसार, जितु पवार, सदानंद विसपुते, जगदीश दुसाने यांचे सहकार्य लाभले.