Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार

by Divya Jalgaon Team
November 5, 2020
in राज्य
0
डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार

मुंबई, प्रतिनिधी – करोनामुळे जाहीर झालेला लॉकडाउन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहे. बुधवारी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल आणि डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेवर निशाणा साधला. “रेल्वे सुरु करण्यासंबंधी खरं तर आमची चार पत्रं होती. त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे.

सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं. आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार आम्हाला विचारत आहेत. आम्ही सगळी यंत्रणा राबवत आहोत. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असं त्यांनी यावेळी सांगितले.

धार्मिकस्थळे बंदच

धार्मिळस्थळे सुरू करण्याची मागणी होत असली तरी सरकारने अद्याप ती सुरू करण्याचा निर्णय नाही. भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरांची कुलुपे उघडण्याचा इशारा दिला तरीही सरकारने धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. राज्यात धार्मिकस्थळे आणि शाळा-महाविद्यालयांवरच सध्या तरी निर्बंध लागू आहेत.

अजून वाचा 

चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उघडणार

Share post
Tags: Marathi NewsMumbai Latest NewsMumbai NewsUdhav Thakareडिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार
Previous Post

चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उघडणार

Next Post

मायक्रो ओबीसींची महाविकास आघाडीने घेतली दखल

Next Post
मायक्रो ओबीसींची महाविकास आघाडीने घेतली दखल

मायक्रो ओबीसींची महाविकास आघाडीने घेतली दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group