जळगाव, प्रतिनिधी । येथील इकरा शिक्षण संस्था संचलित येथील एच.जे.थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव चे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर चांद खान सफदर खान यांना नुकताच “राज्यस्तरीय क्रिडा रत्न पुरस्काराने” नाशिक शहरात सन्मानित करण्यात आले.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई . २१व्या वर्षातील पुरस्कार सोहळा २०२१ औरंगाबाद कर हाल नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. या ब्रीद वाक्यावर गेली एकवीस वर्षे कार्यरत पुरस्कार नामांकनाची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. राज्यस्तरीय गुनिजन गौरव महापरिषद मध्ये विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडाशिक्षक, कलाशिक्षक, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था , निर्मल व हरित गावे, ग्रामपंचायती, तंटामुक्त समित्या, सामाजिक सांस्कृतिक मंडळे, संस्था, संघटना , पतसंस्था, बँका, सहकार क्षेत्रातील व्यक्ती, आणि संस्थांचा विविध क्षेत्रात कार्यशील कर्तुत्ववान गुणी जणांसाठी खास महा सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरव पदक, विशेष महावस्त्र, खास आकर्षक मानपत्र, मानकरी बेच, आणि मानाचा फेटा, असे असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मुंबई नाशिक आणि पुणे या तीन पैकी कोणत्याही एका शहरात प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकार करता येते. प्रा डॉ.चांदखान यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार, प्राध्यापक डॉक्टर इक्बाल शहा, सचिव एजाज अहमद अब्दुल गफ्फार मलिक, व इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे