जळगाव, प्रतिनिधी । आज दि २२ रोजी कॅम्ब्रिज विद्यापीठ व रॉयल सोसायटी यांचे फेल्लोवशीप मिळवलेल्या रामानुजन श्रीनिवास यांच्या जयंती दिनानिमित्त गणित दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे गणित शिक्षक पाटील सुधीर यांनी गणित दिनाचे महत्व विषद केले. श्रीनिवास रामानुजन यांनी गणितासाठी केलेले कार्य सांगितले. व गणितातील गमती जमती सांगितल्या.सौ. अहिरे मनीषा यांनी गणित सोपे कसे होईल याविषयी माहिती दिली.व शून्य या संख्याचा शोध कोणी लावला या बद्दल महियी सांगितली. सदर कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावर प्रश्नमंजुषा व्हाट्स अपवर टाकण्यात आली. याची माहिती पर्यवेक्षक श्री परदेशी राजेशसिंग यांनी दिली. तर 22 डिसेंबर हा वर्षातला लहान दिवस याची माहिती श्री येवले विजय यांनी दिली. दुपार सत्रात गणिताविषयी माहिती गणित शिक्षिका सौ बच्छाव शुभांगी यांनी विद्यार्थिनींना दिली. २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस या दिवसाची भौगोलिक माहिती श्री शर्मा प्रेमचंद यांनी विद्यार्थिनींना सांगितली. सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका शोभा मोरे यांनी सर्व विद्यार्थिनींना गणित विषयाचे पुढील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.