जळगाव, प्रतिनिधी । पाळधी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे दि २० डिसेंबर २०२१ सोमवार रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.
सकाळी भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे चिमुकले विद्यार्थी गाडगेबाबा यांच्या पोषाखात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी शाळा व शालेय परिसराची स्वच्छता केली तद्नंतर विद्यार्थी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगे बाबांच्या भजनावर ठेका धरला होता.
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय व भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी या विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामपंचायत, परीट नगर परिसर, श्री राम मंदिर, पोलिस स्टेशन परिसर, बस स्टॅन्ड व बाजार पट्टा याठिकाणी गाडगे बाबांचा संदेश याप्रमाणे स्वच्छता केली.
श्रमदान केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वैचारीक पातळीत वाढ व्हावी यासाठी भाऊसाहेब गुलाब रावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त भाग घेतला यात 18 विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता विषयक कार्य व विचार या विषयी आपले विचार मांडले या स्पर्धेत परीक्षक म्हणून बेंडाळे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पवार सर भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ शिक्षक आर व्ही पाटील सर व भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक भुषण पाटील यांनी परीक्षक म्हणून चोख कामगिरी बजावली.
स्पर्धेचे जेष्ठ परीक्षक प्राध्यापक दीपक पवार सर यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा व वक्तृत्व नियम या विषयी सखोल मार्गदर्शन केले व निकाल घोषित केला यात प्रथम क्रमांक तनुष्री योगेश पाटील द्वितीय क्रमांक निकिता किशोर साळुंखे व तृतीय क्रमांक दिनेश विलास सोनवणे यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, विक्रम पाटील, पाळधी गावाचे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, ग्राम विकास अधिकारी नवल पाटील, माजी सरपंच अरुण पाटील,संस्थेचे संचालक डी जी नाना, गोकुळ नन्नवरे, कोतवाल राहुल शिरोळे, शिवाजी पाटील, तसेच भाऊसो गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय डी डी कंखरे, भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर, इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य सचिन पाटील, जीपीएस परिवारातील सर्व शिक्षक वृंद यांच्यासह गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गाडगेबाबांची प्रतिमा कला शिक्षिका प्रीती चौधरी यांनी फलकावर साकारली