Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रवासी वाहून नेणारे रिक्षाची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार

by Divya Jalgaon Team
December 21, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
प्रवासी वाहून नेणारे रिक्षाची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार

जामनेर, प्रतिनिधी । येथील लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून येणाऱ्या रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले असून यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला समोरून धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी हा अपघात घडला. लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली.

यात दोन जण जागीच ठार झाले असून दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून ट्रक देखील रस्त्यावर उलटला असून याचा चालक आणि क्लिनरला देखील दुखापत झाली आहे.

या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. दरम्यान पोलिसांनी अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रूग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. जखमींना जामनेर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते .

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २१ डिसेंबर २०२१

Next Post

जीपीएस ने दिले स्वच्छतेचे धडे (व्हिडिओ)

Next Post
जीपीएस ने दिले स्वच्छतेचे धडे (व्हिडिओ)

जीपीएस ने दिले स्वच्छतेचे धडे (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group