Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : रावेर ब्राऊन शुगर प्रकरणी मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

by Divya Jalgaon Team
December 19, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

जळगाव प्रतिनिधी । रावेर येथील ब्राऊन शुगर प्रकरणी मुख्य आरोपीला रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काल रावेर येथून एका महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट खुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे मोठी कारवाई केली होती. याच्या अंतर्गत रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ रा.मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बर्‍हाणपुर) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट जप्त करण्यात आले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते. या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीचे एक पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले. या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकार्‍याने केली आहे.

याप्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आला असून परिणामी यातील रॅकेट उघड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share post
Previous Post

जळगावात डी मार्ट पार्किंगमधून एकाची दुचाकीची चोरी, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, २० डिसेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, २० डिसेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group