जळगाव, प्रतिनिधी । एका भागातील पार्किंगमध्ये असलेली दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील डी मार्ट परिसरात पार्क केलेली तरूणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र लोटन न्हावी (वय-३४) रा. जिजाऊ नगर, वाघ नगर जवळ हा सलुन दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान शहरातील डीमार्ट येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एएच ६९९९) ने गेला.
दुचाकी डीमार्ट परिसरातील पार्क केली. खरेदी करून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर आढळली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली मिळाली नाही. याप्रकरणी रविंद्र न्हावी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविंद्र न्हावी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना चंद्रकांत पाटील करीत आहे.