Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता कोरोना आरटीपीसीआर चाचणी ३३० रुपयांत होणार – राज्य सरकार

by Divya Jalgaon Team
December 7, 2021
in राष्ट्रीय
0
आता कोरोना आरटीपीसीआर चाचणी ३३० रुपयांत होणार – राज्य सरकार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आरटीपीसीआर, अँटीजेन, अँटीबॉडीज चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला असून हे दर सोमवारपासून लागू झाले आहेत. रुग्णाने प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर चाचणी केल्यास सध्याच्या ५०० रुपयांऐवजी आता ३५० रुपये आकारले जाणार आहे..

राज्यात खासगी प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर व अन्य चाचण्यांचे दर गेल्या दीड वर्षात काही वेळा कमी केले असून सध्या ३१ मार्च २०२१ रोजी निश्चित केलेले दर लागू आहेत. कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता खासगी प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर व अन्य चाचण्यांचे दर पुन्हा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाहतूक, पीपीई किट व अन्य खर्च, कर यासह हे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.

‘विशेष मागासवर्गाचे दोन टक्के आरक्षण रद्द करा’; उच्च न्यायालयात जनहित याचिका रुग्णालय किंवा करोना केंद्रातून रुग्णाचे स्वॅब नमुने घेतल्यास सध्याच्या ६०० रुपयांऐवजी ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास ८०० रुपयांऐवजी ७०० रुपये दर आकारला जाईल.

अँटीबॉडीजच्या एलिसा चाचणीसाठी रुग्ण प्रयोगशाळेत गेल्यास २०० रुपये, एखाद्या केंद्रावरून नमुने घेतल्यास २५० रुपये व रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास ३५० रुपये आकारले जातील. तर क्लिआ चाचणीसाठी याच पद्धतीने अनुक्रमे ३००,४०० व ५०० रुपये आकारले जातील. रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी याचप्रकारे अनुक्रमे १००,१५० व २५० रुपये दर आकारला जाईल. खासगी प्रयोगशाळांना हे दर बंधनकारक असून त्यापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास राज्य सरकारकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ७ डिसेंबर २०२१

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषित

Next Post
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group