जळगाव (प्रतिनिधी) : शिवाजीनगर भागातील रहिवास असलेले जळगाव शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे (वय २८, रा. शिवाजी नगर) यांचा जळगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील उस्मानिया पार्कजवळ अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्रांसह लोखंडी सळईने हल्ला चढवत खून करून हल्लेखोर पसार झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनातून २ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.जळगावात खून : माजी महापौरांच्या पुत्राची निर्घृण हत्या.
माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजु (बाबू) याचा गुरुवारी वाढदिवस होता. बँनर व फटाके आणून भावाचा वाढदिवस जोरदार साजरा करु, अशी तयारी करून राकेश सपकाळे, त्याचा लहान भाऊ सोनु सपकाळे व गाडी चालक सलमान हे तिघेही रात्री ११.१५ वाजता हॉटेल अशोका पॅलेस येथून घरी शिवाजीनगर येथे निघाले होते.जळगावात खून : माजी महापौरांच्या पुत्राची निर्घृण हत्या.
शिवाजीनगरच्या स्मशानभूमीजवळ आल्यावर अज्ञात संशयित लाडू गँगच्या लोकांनी हल्ला चढवून राकेश याच्यावर जबरदस्त वार झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोनूच्या हातावर वार होऊन जखमी झाला व चालक सलमान याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनू सपकाळे यांची सोन्याची अंगठी व चैन घटनास्थळावरुन गायब झाली असल्याची माहिती कळाली. आधी ओम क्रिटिकल नंतर देवकर कॉलेजमधील सिव्हिल रुग्णालयात राकेशला हलवण्यात आले. याठिकाणी भरपूर गर्दी जमा झाली आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण कुमार मुंढे, उप पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. प्राथमिक चौकशीत गणेश व भुर्या या दोन जणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने ही हत्या केल्याचे माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. संशयितांच्या शोधार्थ शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.
अजून वाचा
ब्रेन हॉस्पीटलजवळ गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरूणाला अटक