जळगाव – येथील शिवाजी नगर उड्डाणपुल सुरु झाल्यापासुन नागरीकांना येणाऱ्या विविधअडथळे त्यावर प्रशासनाची दिरंगाई व मक्तेदार यांनी आतापर्यंत संथ गतिने सुरू असलेले काम या पार्श्वभूमीवर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे.
शिवाजीनगर परिसरातील नगरसेवक या नात्याने पुलासंदर्भात नागरीकांच्या तक्रारी आमच्याकडे वाढल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पुलांच्या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत की या पुलाचे काम मार्च पर्यंत होणार की नाही. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेल्यावर कामाची सद्यस्थिती बघितल्यावर ते संथ गतीने सुरू असल्याचे समजले. टॉवर कडुन येणारे अडथळे इलेक्ट्रिक पोल व शिवाजी नगर कडुन पुलासाठी 13 पोल सिमेंटचे उभारण्याकरीता ते अध्यस्थितीत आहे. तसेच पुलाचे काम संथ गतीने चालु असुन पिलर उभा करण्याकरीता कप्लीट एका पिलरला 21 ते 22 दिवस लागत आहे. यावरुन लक्ष घालुन हे काम मार्चपर्यंत होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.