जळगाव, प्रतिनिधी । स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत अस्थिरोग (हाडांचे) तपासणी शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी राज माध्यमिक विद्यालय, रामेश्वर कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक गणेश सोनवणे, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, शिवसेना उपमहानगर प्रमुख ललित ढांडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, सह-समन्वयक भावेश ढाके, आदी उपस्थित होते. या शिबीरात अस्थिरोग चिकित्सक डॉ. योगेंद्र नेहेते यांच्या उपस्थितीत BMD ( हाडांचा ठिसुळपणा तपासणी), शारिरीक चाचणी, रक्तातील शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, वजन व उंची, अत्यंत अल्प दरात थायरॉईडची तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबीराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सदस्य अख्तर अली सय्यद, गणेश गुरव, दिपक घ्यार, फिरोज शेख, चेतन परदेशी, अनिल पवार, आदींनी शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.