यावल, प्रतिनीधी । तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या गावात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सरपंच नवाज तडवी उप सरपंच धनराज पाटिल ग्रमविकास अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिप प्रज्वलीत करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन केले.प्रसंगी पोलीस पाटील राजरन्त आढाळे ग्राम पं.सदस्या राजेद्र झाबंरे मनोहर महाजन दिलीप तायडे जुम्मा तडवी आशा आढाळे कल्पना राणे हेमलता जावळे कल्पना पाटिल शबनम तडवी सकिला तडवी ऐश्वर्या कोलते ,अंगणवाडी सेविका आशा आढाळे तसेच उपस्थित मान्यावर आकाश सपकाळे प्रदिप तायडे ग्रामस्थांची उपस्थिती लाक्षणिक होती. दरम्यान संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.दहशत वाद्यांच्या २६/११ च्या झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली.