Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कपाशी व्यापाऱ्याची लुट करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

by Divya Jalgaon Team
November 26, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कपाशी व्यापाऱ्याची लुट करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

जामनेर प्रतिनिधी | सोनाळा येथील शेतकऱ्याला धाक दाखवून सात लाख रूपयांची लुट करणार्‍या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. काल ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांचे मोटरसायकल काढून घेतली. आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे. एलसीबीच्या पथकाने अटक केलेल्यांमध्ये गोपाळ हरी पाटील (सोनाळा ता.जामनेर), प्रवीण रमेश कोळी (वाल्मिक नगर जळगाव), गोपाळ श्रावण तेली (कळमसरा ता. पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (कळमसरा ता. पाचोरा), लखन दारासिंग पासी (जळगाव) यांचा समावेश आहे. या अटकेतील आरोपींकडून ४ लाख ७४ हजार ४६० रुपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कट्टा, ५ मोबाईल, २ मोटार सायकली असा एकूण ५ लाख ९६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१

Next Post

अमळनेर येथे ५ वर्षीय बेपत्ता बालिकेचा मृतदेह नदीमध्ये आढळला

Next Post
धक्कादायक : 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह जाळला

अमळनेर येथे ५ वर्षीय बेपत्ता बालिकेचा मृतदेह नदीमध्ये आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group