जळगाव – वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसी कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा आणि जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा शहरातील पत्रकार भवनात घेण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड.धनराज वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हा महासचिव दिनेश इखारे , जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर , रफिक बेग, डिगंबर सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे मुबारक पठाण, प्रकाश सरदार, अरुण तायडे, गमिर शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुजाता ठाकुर , बाळा पवार, सुपडा निकम, बालाजी पठाडे,सचिन सुरवाडे, भिकाजी असलकर, बाळासाहेब पाटील, सुनिल ठाकुर, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा संगिता भामरे, देवदत्त मकासरे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, विद्यासागर खरात, सचिन वानखेडे, प्रमोद बावस्कर, गणेश महाले, सुमित सोनवणे, जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे, अण्णा मोरे, रुपेश साळुंके, बबन कांबळे, स्वप्नील सोनवणे, राजु इंगळे, विनोद लोखंडे, सुरेश सुरवाडे आदी उपस्थित होते.


