जळगाव, प्रतिनिधी । १९ रोजी मविप्र संस्थेच्या सर्व संस्था प्रमुख को ऑडीनेशन कमिटीची सभा संस्थेचे चेअरमन गोकुल बारसे (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० घेण्यात आली.
या सभेत विद्यालयाचा अडीअडचणी कर्मचारी स्टाफ विद्यार्थी संस्था शैक्षणिक विषयांवर चर्चा होऊन विषय शिक्षकांकडून अभ्यासक्रमाबाबत सूचना देण्यात आल्या व विषय सूचीनुसार सर्व विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. सभेत संस्थेचे सचिव निलेश भोईटे, व्हा. चेअरमन बाळासाहेब निंबाळकर, कर्मचारी संचालक महेंद्र भोईटेसह संस्थेचे विश्वस्त व म. को – ऑर्डिनेशन कमेटी सदस्य मुख्याध्यापक प्राचार्य यांची उपस्थितीत सभा संपन्न झाली. तसेच आभार प्रदर्शन व्हॉ. चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांनी केले.