रावेर – तालुक्यातील खिरोदा येथील तरूणाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तालुक्यातील खिरोदा येथील रहिवासी भागवत पाटील यांचा मुलगा हर्षल पाटील (वय २५) हा शेतात जात असल्याचे सांगुन आज सकाळी घरातून गेला होता. परंतु उशीर होऊन ही घरी परतला नाही म्हणून हर्षल यांचा शोधा-शोध सुरु झाला. यावेळी गाव नदीवर जमा असलेल्या पाण्यात त्याने आत्महत्या केली आहे.
हर्षलचा नुकताच विवाह निश्चित झाला होता. व जानेवारीत त्याचा विवाह करण्याचे देखील ठरल होते. त्यांच्या आत्महत्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.
घटनास्थळी सपोनि शितलकुमार नाईक यांनी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या बाबत रावेर पोलिसात अकास्मात गुन्हाची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पोहेकॉ सतीष सानप करीत आहेत.