बॉलिवूड आणि क्रिकेटविश्व यांचं एकमेकांशी असलेलं परस्पर नातं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आजवर अनेक लोकप्रिय क्रिकेटपटूंनी बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींशी लग्न केलं आहे. त्यामुळे या बॉलिवूड अभिनेत्रींची चर्चा कलाविश्वासह क्रीडाविश्वातही रंगताना दिसते. विशेष म्हणजे या अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रियतेमुळे चर्चेत येत असतात.
सध्या चर्चा रंगली आहे ती क्रिकेटपटू जहीर खान याच्या पत्नीची म्हणजेच अभिनेत्री सागरिका घाटगे हिची. सागरिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याच वेळा इन्स्टावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्येच तिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. सध्या तिच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तसंच अनेक जण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.
सागरिकाने तिच्या लहानपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सागरिका अत्यंक गोड आणि निरागस दिसत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे. तसंच ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. सागरिकाने क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं असून त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.