जळगाव प्रतिनिधी । औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर पोलीसात तक्रार दाखल होताच संबंधीत तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणार्या एका १५ वर्षाच्या अल्पवयीन तरूणीचे पंकज नामदेव सोनवणे ( रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरूणाने अपहरण करून तिला पुणे येथे नेले. पुणे येथील आपल्या मावस भावाच्या खोलीवर त्याने या तरूणीवर अत्याचार केेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच पंकज सोनवणे याने विषारी द्रव प्रदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.