जळगाव, प्रतिनिधी । बालदिन सप्ताह निमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित जळगाव चाईल्ड लाईन 1098 च्या वतीने दापोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये बेटी बचाव बेटी पढाव विषयास अनुसरून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या रांगोळी कलेचा आविष्कार करीत असताना विद्यार्थिनींनी सामाजिक शैक्षणिक अशा विविध समस्या रेखाटल्या. स्पर्धेचे परिक्षण जिल्ह्यातील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार कुमुदिनी नारखेडे व मांगीलाल बाफना नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका राजश्री डोल्हारे यांनी केले.
यावेळी मुख्य अतिथी म्हणुन जिल्हा परिषद शाळा दापोराचे मुख्याध्यापक राजाराम सोनवणे, दापोरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोविंदा तांदळे, सदस्य चंदुलाल काळे, माधवराव गवदे, गावातील ज्येष्ठ नागरिक जानकीराम सोनवणे दिलीप जैन उपस्थित होते. मुख्याध्यापक राजाराम सोनवणे यांनी आपल्या मनोगतात चाईल्ड लाईनच्या उपक्रमाचे कौतुक करत कोरोना प्रादुर्भाव मुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या मागील काही कालावधीपासून ऑनलाइन स्वरूपात काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या परंतु आमच्या ग्रामीण भागांमधील शाळा या मुलांच्या प्रत्यक्ष उपस्थिती मध्ये आत्ता सुरू होत असून मुलांसाठी अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला व चाइल्ड लाइन सारख्या उपयोगी माध्यमांचे विषयी मुलांना माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
रांगोळी स्पर्धेतील विजेते : स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जया जानकीराम सोनवणे, द्वितीय भाग्यश्री अनिल सोन्ने, तृतीय रवीना पंढरीनाथ सोन्ने, उत्तेजनार्थ राजश्री कैलास तांदळे व राजनंदिनी नारायण सोनवणे. रांगोळी स्पर्धा ही फक्त मुलींसाठी सीमित न राहता शाळेतील मुलांनीही आपला सहभाग नोंदविला व त्यामध्ये सागर रवींद्र राणा प्रथम व रोहित शरद राणा यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
रांगोळी स्पर्धेला चाइल्ड लाईन जिल्हा समन्वयक भानुदास येवलेकर, जिप शाळेतील उषा माळी, रवींद्र पाटील, तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री रवींद्र पाटील, प्रास्ताविक चाईल्ड लाईन समुपदेशिका वृषाली जोशी यांनी केले.रांगोळी स्पर्धा यशस्वीतेसाठी चाईल्ड लाईन टिम मेंबर रोहन सोनगडा, कुणाल शुक्ल, संजीवनी सावळे, प्रसन्न बागल यांनी काम पाहिले.