मेष:-बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी असेल.
वृषभ:-आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो. दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. कुटुंबातील सदस्य चांगल्या बातम्या देतील.
मिथुन:-खेळ व कला यांमध्ये वर्चस्व राहील. अनपेक्षित खर्च सामोरी येतील. मानसिक सौख्याला प्राधान्य द्या. व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. पित्त प्रकृतीत वाढ संभवते.
कर्क:-आपले हितचिंतक पारखून घ्या. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील. काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. घरात टापटीप ठेवाल.
सिंह:-आपली स्वप्ने सत्यात उतरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. त्या प्रमाणे केलेली कृती समाधान देईल. कामे मनाजोगी पार पडतील.
कन्या:-घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल. कामातील बदल आनंद देईल. मन प्रसन्न राहील.
तूळ:-आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल. हितशत्रूकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे. खर्चाचा ताळमेळ साधावा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक:-आपल्याच मतावर अडून राहाल. चारचौघांत कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. तुमचा रूबाब वाढेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.
धनू:-आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. मोहाला बळी पाडू नका. कामातून आनंद शोधाल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर:-जिद्द व चिकाटी सोडू नका. जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील. व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये कामाकडेच पूर्ण लक्ष द्या.
कुंभ:-खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल. व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल.
मीन:-प्रलंबित येणी मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यापारात नवीन धोरण ठरवाल. ध्येयाचा पाठलाग करा.