जळगाव, प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील एका तृतीयपंथीयाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमीजवळील रहिवाशी विक्रांत उर्फ विक्की उर्फ लैला मनोहर खरकार (वय-२०) या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी आक्रोश केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मयत घोषीत केले. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु हाते.