जळगाव, प्रतिनिधी । देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.