जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे 9 ऑक्टोबर 2021 रोजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन जळगाव शहर आ. राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते दिव्यांग भगिनी सविता अशोक साळुंके हिला देण्यात आली.
या भगिनीला उदरनिर्वाहासाठी पिको फॉल शिलाई मशीनची खूप आवश्यकता होती ती गरज तिची नारीशक्ती ग्रुप तर्फे पूर्ण करण्यात आली तसेच तिला आपला उद्योग धंदा वाढवण्यासाठी हँडीकॅप्पड ई-बाईक ची देखील गरज आहे असे तिने आपल्या मनोगतातून बोलून दाखवले. त्यावेळी सविता या दिव्यांग भगिनीची स्थिती पाहता तत्क्षणी मा.राजूमामा भोळे यांनी तिला दिवाळीपर्यंत हँडीकॅप्पड ई_बाईक देण्याचा शब्द दिला. तात्काळ कार्यवाही करून राजूमामा भोळे व नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष मनीषा पाटील यांच्या माध्यमातून कुटुंबीयांसह उपस्थित सविताला हँडीकॅप्पड ई_बाईक देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सुमित्रा पाटील, ज्योती राणे , ॲड सीमा जाधव, भावना चव्हाण, विनोद शुक्ल उपस्थित होते.