जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीवर रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून एकाने विनयभंग केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा भागात ३० वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विवाहिता ह्या पती व मुलासह दुचाकीने दवाखान्यात जात असतांना नुर मोहम्मद लतीफ (वय-४०) रा. जळगाव हा दुचाकीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या दुचाकीसमोर त्याची दुचाकी लावून त्यांना थांबविले. विवाहितेला माझ्याशी लग्न कर नाही तर तुझे घर किंवा पैसे दे असे सांगितले. याला नकार दिल्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष डोलारे करीत आहे.