मणिपूर, वृत्तसंस्था । मणिपूरच्या चूरचंदपूरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराच्या एका ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये एक कर्नल, त्यांची पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलासह आसाम रायफल्सचे चार जवान ठार झाले.
या हल्ल्यातील मृतांमध्ये 46 असम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांचा समावेश होता. हा हल्ला दिहेंग परिसरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर झाला असून, त्यात इतर चार जवानही जखमी झाले असल्यांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. “शहिदांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
“मणिपूरच्या चूरचंदपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला हल्ला भ्याड हल्ला आहे. या हल्ल्यात देशानं पाच जवान गमावले आहेत. त्यात कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा समावेश आहे.” मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी, राज्यातील पोलिस आणि निमलष्करी दल कट्टरतावाद्यांचा शोध घेत असल्याचं सांगितलं आहे.