जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचारी संपावर आहेत एसटी ही आजच्या खाजगीकरणाच्या काळात ग्रामीण व अतिदुर्गम भागातील सर्वसामान्यांसाठी उरलेले एकमेव हक्काचे प्रवासाचे साधन आहे. एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठी असणारी सार्वजनिक वाहतूक संस्था आहे.
मात्र जागतिकीकरणाच्या दबावात ही वाहतूक व्यवस्था हि खाजगी करण्याचा डाव पूर्वीपासूनच सुरु आहे त्याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही मात्र येथील मानवी जीवन निर्देशांक उंचावण्यासाठी विकासप्रक्रियेत एसटी चा मोठा वाटा आहे ग्रामीण व अतिदुर्गम भागात शिक्षण रोजगार व आरोग्याच्या सुविधांसाठी आजही सर्वसामान्य जनता एसटी वरच अवलंबून आहे त्यामुळे हि एसटी वाचवणे हे महत्वाचे आहे एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे एसटी चे शासनात विलीनीकरणाचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आला आहे मात्र यातही राजकारण घालून विरोधी पक्ष व आघाडी सरकार मात्र या संपात मुल मुद्दा बाजूला सारून आडमुठे पणाची भूमिका घेतांना दिसत आहेत लोकसंघर्ष मोर्चा या बाबतीत या संपाला पाठिबा देत असून शासनाला आवाहन करीत आहे कि शासनाने लोककल्याणकारी भूमिकेतून ना नफा ना तोटा या तत्वावर एसटी महामंडळाचे शासकीय करण करून सार्वजनिक सेवा म्हणून हे महामंडळ चालवावे तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करून त्यांची वेतन वाढ करावी
भारतीय राज्य घटनेनुसार आपण लोककल्याणकारी लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली आहे या व्यवस्थेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना ही जर वाढीव वेतन व पेन्शन मिळते तर ते सर्वसामान्य जनतेच्या सेवे साठी झटणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना ही मिळायला हवे या देशात लोककल्याणाची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे सवर्सामान्य जनतेला आरोग्य शिक्षण व रोजगार या बाबतीत सुरक्षा देणे हि शासनाची जबाबदारी आहे त्या साठी सार्वजनिक सेवा व्यवस्था या नफा किंवा तोटा या भूमिकेतून चालवल्या जावू शकत नाहीत जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे शासनाने या आधीच अनेक सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण केले आहे केंद्राने अनेक सार्वजनिक उद्योग हे विकून टाकलेत आणि या विरोधात महाविकास आघाडी सातत्याने टीका ही करीत आली आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आता एसटी महामंडळाचे शासकीय करण करून देशापुढे नवा आदर्श घालून द्यावा
अन्यथा एसटी जर वाचवली नाही तर इथली सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून आपली ताकद नक्कीच दाखवेल म्हणून लोक संघर्ष मोर्चा येथील ज्या शेतकऱ्यांसाठी, आदिवासी समूहांसाठी तसेच शोषित वंचित बहुजन समाजासाठी लढतो आहे त्या सर्व समूहांच्या जगण्याशी एसटी ची सार्वजनिक सुविधा निगडीत आहे म्हणून एसटी महामंडळाच्या मागण्यांना लोकसंघर्ष मोर्चा पाठिंबा देत आहे व शासनाने तातडीने यावर समाधानकारक तोडगा काढावा अशी मागणी करीत आहे लोक संघर्ष मोर्चा वेळ पडल्यास ह्या आंदोलनात सक्रिय उतरेल असे संघटनेच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कर्डिले, ईश्वर पाटील, भाऊसाहेब चव्हाण , प्रमोद पाटील यांनी कळवले आहे