Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पळासखेडे येथे गवळी समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन

by Divya Jalgaon Team
November 11, 2021
in जळगाव
0
पळासखेडे येथे गवळी समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन

जळगाव, प्रतिनिधी । पळासखेडे (मिराचे) ता. जामनेर जिल्हा जळगांव येथे वास्तव्यास असलेल्या विरशैव लिंगायत गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचे दफन विधी करण्यात येतो. या अंतीम विधीसाठी पळासखेडे(मिराचे) ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण परिसरातील स्वतंत्र जमीन उपलब्ध होण्याबाबत समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या जळगांव जिल्हा शाखेतर्फे ग्रामपंचायत उपसरपंच रवींद्र हडप यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी या निवेदनात म्हटले आहे की, पळासखेडे(मिराचे)ता. जामनेर जिल्हा जळगांव येथे गवळी वाडा परिसरात साठ ते सत्तर वर्षापासुन गवळी समाज वास्तव्यास आहे. अनेक वर्षांपासून गवळी समाजास दिवंगत व्यक्तीच्या अंतिम दफनविधी साठी जमीन उपलब्ध नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे.तरी समाजास स्वतंत्र जमीन उपलब्ध होण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. जमीन उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था धुळे शाखा जळगांव जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे यांनी निवेदन दिले यावेळी गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, जिल्हा खजिनदार शंकर काटकर, जिल्हा सहसचिव अशोक जोमीवाळे,ग्रामपंचायत सदस्य श्री दिपक परदेशी ,जेष्ठ पंच आनंदाआप्पा जोमीवाळे, शिदाआप्पा देवर्षी, लक्सिमन नागापुरे, भागवत चौघुले,विशाल गवळी, विजय गवळी, अनिल गवळी आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share post
Previous Post

रॉकॉच्यावतीने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

Next Post
तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group