Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चोरट्यांनी केले बंद घर टार्गेट, तीन लाख ६४ हजाराचा ऐवज लांबविला

by Divya Jalgaon Team
November 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील एका बंद घरातील चोरट्याने सोने चांदींसह रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घरातील लाकडी कपाटातून सोने चांदी व रोकड असे ३ लाख ६४ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील छायादीग्राम भागात उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील छायादीग्राम भागात राहणारे अविनाश फकिरराव चव्हाण (वय-४०) हे दिवाळी निमित्ताने शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे गेले.

मात्र रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता ते आपल्या घरी परतल्यावर स्वयंपाक गृहाच्या मागील लोखंडी दरवाजाचे आतील कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावर अविनाश चव्हाण यांनी वरच्या मजल्यावरील लाकडी कपाटाची पाहणी केली असता ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोने चांदी व रोकड असे एकूण ३ लाख ६४ हजार पाचशे पन्नास रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अविनाश फकिरराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Share post
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार, एक जण जखमी

Next Post

चार ते पाच जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मृत्यू

Next Post
पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांना दगडासह लोखंडी पट्टीने मारहाण

चार ते पाच जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group