Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार, एक जण जखमी

by Divya Jalgaon Team
November 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बहाळ गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील भऊर येथील मामा-भाच्याचा मृत्यू झाला असून तिसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील भऊर येथील आकाश भिवसन मोरे (वय १८), अनिल संजय गायकवाड (वय १९) व विनोद विक्रम मोरे (वय १९) हे तिघेही तरुण दुचाकी (एमएच- १९, डिएच- ०१३५)ने रविवारी दुपारी चाळीसगाव येथे गेले होते.

यानंतर ते तिघेही रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भऊर गावाकडे निघाले. दरम्यान बहाळ गावापासून जवळच असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात आकाश मोरे व अनिल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अपघातातील मृत आकाश मोरे व अनिल गायकवाड मामा-भाचे होते. अपघातात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, ८ नोव्हेंबर २०२१

Next Post

चोरट्यांनी केले बंद घर टार्गेट, तीन लाख ६४ हजाराचा ऐवज लांबविला

Next Post
जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

चोरट्यांनी केले बंद घर टार्गेट, तीन लाख ६४ हजाराचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group