Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात एका कामगाराची आज ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक

by Divya Jalgaon Team
November 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील आज एका भागात राहणाऱ्या कामगाराची ९० हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका कामगाराची ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना तब्बल एका महिन्यानंतर उघड झाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने अनिल कुमार इंद्रदत्त त्रिपाठी( वय ५२ रा. एमआयडीसी, जळगाव) या प्रौढाची ९० हजार ७८० रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. त्रिपाठी यांनी ३ नोव्हेंबर रोजी बँकेत जावून व्यवहार तपासले असता, त्यांना त्यांच्या खात्यातून ९० हजार ७८० रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्रिपाठी हे एमआयडीसीतील खान्देश फ्लोअर मिलमध्ये खासगी नोकरी करतात. याचठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३० ऑक्टोंबर रोजी ते खान्देश मिल येथे कंपनीत कामावर जात असतांना , त्यांना ९३७१७७७५५४ या क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने त्रिपाठी यांना त्यांनी क्रेडीट कार्डच्या आधारावर केलेल सर्व व्यवहाराचे तपशील सांगत त्रिपाठी यांचा विश्‍वास संपादन केला. अतिरिक्त चार्ज लागत असल्याने त्रिपाठी यांनी संबंधितांना मला क्रेडीट कार्ड नकोय ते बंद करा असे सांगितले.

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने संबंधितांनी त्रिपाठी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. ओटीप सांगताच त्रिपाठी यांच्या बँकेच्या खात्यातून ९० हजार ७८० संबंधितांनी काढून घेतले. त्यानंतर संबंधित फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने त्रिपाठी यांना थॅक्यू म्हणून फोन कट केला. तसेच पुढील दोन दिवसात कुणाचेही फोन उचलू नका अन्यथा क्रेडीट कार्ड पुन्हा सुरु होईल अशी बतावणी केली. ३ नोव्हेंबर रोजी त्रिपाठी त्यांचे खाते असलेल्या स्टेट बँकेत गेले असता त्यांना त्यांच्या खात्यावरुन ९० हजार ७८० रुपये काढून घेतल्याचे दिसून आले. ३० ऑक्टोंबर रोजी क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने फोनवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर त्रिपाठी यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे करीत आहेत.

Share post
Previous Post

खंडेराव नगर येथे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळले

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, ७ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, ७ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group