जळगाव । डॉ. उल्हास पाटील रुग्णालय परिसरात तब्बल १८० खाटांचे अद्यावत आणि सुसज्ज असा वॉर्ड तयार करण्याच्या कामाचे मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी भूमीपुजन करण्यात आले. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या उपस्थीतीत कुदळ मारुन भूमीपुजन करण्यात आले. फ्रेब्रुवारी २०२१ पर्यंत हा प्रशस्त वॉर्ड रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा मानस डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी व्यक्त केला. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील निसर्गरम्य वातावरणात, नैसर्गिक शुद्ध हवेच्या ठिकाणी आता नव्याने १८० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात येत आहे.
याप्रसंगी ह्दयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, उमाकांत भिरुड, भागवत किनगे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.हेमंत धांडे, प्रा.विजय चौधरी, बांधकाम विभागाचे परेश पाटील, हितेंद्र चौधरी, पराग राणे, नरेंद्र भिरुड, तौसिब देशपांडे, रवि कापडे, सुनिल ढाके, श्रीराम बारेला, शिवानंद बिरादर, परिमल भिरुड, आर्कि.हर्षदा महाजन, अजय वाणी, अभय श्रावगे, एन.जी.चौधरी, मनोहर पाटील आदिंची उपस्थीती होती.