जळगाव प्रतिनिधी । कृषी औद्योगीक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोड्याप्रकरणी आज दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे.
संशयित आरोपी रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे संस्थेत बर्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. या अनुषंगाने ६ जुलै २०२१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अनोळखी चार जणांनी संस्थेच्या कार्यालयाचा कडी कोयंडा ताडून आत प्रवेश केला होता. त्यांनी संस्थेच्या आतील कार्यालयात झोपलेल्या कर्मचार्यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला.
त्यांना तिजोरी न उघडता आल्यामुळे त्यांनी शेवटी तिजोरी घेऊनच पळ काढला. या तिजोरीत अडीच लाख रूपयांची रोकड असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजीव मुकुंदराव पाटील यांनी दिली होती . संजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पथकाने संशयित आरोपी शिवासिंग विरसिंग दुधाणी ( वय २८, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे ) याला ठाण्यातून आणि विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी ( वय ४५ रा.झरी ता. परभणी) याला वर्धा येथून दोघांना यापुर्वी २२ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. यांची कसून चौकशी केली असता उर्वरित दोघांना जिल्हा पेठ पोलीसांनी रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आली आहे.
जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक सलीम तडवी, पोलीस शिपाई विकास पहुरकर, समाधान पाटील, रवींद्र साबळे, माधव कांबळे, रिहान शेख आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.