जळगाव, प्रतिनिधी । दिवाळी सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खादय पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा, याबाबतचे निवेदन आज प्रहार जनशक्ती युवाच्यावतीने जिल्हा सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.
कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईक; रूग्णांकडून आर्थिक मलिदा लाटून अगोदरच नागरीकांच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. ऑक्सिजन बेडची संख्या;पॉझिटीव्हीटी दर पाहता व कोरोनावरील लसीकरणामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत आलेली आहे.त्यामुळे आता यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाच्या नियमाची शिथीलता झालेली आहे. खाजगी दुकाने;बाजारपेठा;नागरीकांच्या सण उत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात खादयपदार्थ खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असते.या अन्न भेसळमुळे नागरीकांचे आरोग्याचा धोका उदभवू नये या करीता खादय भेसळसाठेबाजी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी.या गर्दीचा फायदा घेत ऐन सणासुदीच्या काळात काही दुकानांतर्फे खादयपदार्थ विक्री केल्याचे देखील मोठे रॅकेट मागच्या सणासुदीच्या काळातील अहवालानुसार अभ्यासाला मिळेल. जनतेची लुट थांबविण्यासाठी प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करून या भेसळयुक्त पदार्थ विक्रीला आळा घालण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते;प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची समिती गठीत करून भेसळ करणाऱ्या खादय पदार्थ विक्री दुकानावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी उपाय योजना कराव्यात. तसेच भेसळयुक्त खादय पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकण्यात यावेत.
या संदर्भात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन आदेशीत व्हावे. सन 2017-18 ते 2018-19 या कालावधीत जिल्ह्यात छापे टाकून भेसळसाठा जप्त करण्यात आलेल्या दुकानावर विशेषत: लक्ष देण्यात यावे आणि भेसळ करणाऱ्या दुकानांवर आपल्या विभागाने छापे टाकून त्या दुकानाचे परवाने रद्द करण्यात यावे तसेच दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
यावेळी निवेदन देतांना निलेश बोरा-युवक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष; जळगांव शहर; मोहन माळी- शहराध्यक्ष-नशिराबाद; बाळासाहेब पाटील- जिल्हाध्यक्ष- प्रहार अपंग क्रांती; सागर गवळी-युवक उपाध्यक्ष;हरीष कुमावत-युवक उपाध्यक्ष;जितेंद्र वाणी-युवक सहचिटनीस; लक्ष्मण पाटील-युवक-संघटक; धनंजय आढाव- युवक- सहसंघटक; शे.शकील शे.मुतालीक; जैनुल शेख; पदाधिकारी;कार्यकर्ते उपस्थित होते या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहे.