Thursday, March 12, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर आर्यन खानचा जामीन मंजूर

by Divya Jalgaon Team
October 28, 2021
in राज्य
0
राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेणार

मुंबई, वृत्तसंस्था । अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात या सर्वांना हा जामीन मिळाला. अनेकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झाले आहे.

भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर आहेत. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली.

अनिल सिंग म्हणाले, ड्रग्जचे आर्यन खान नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्तीसोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचे माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले, तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले आहेत.

ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद आरोपींचे वकील करत आहेत. पण, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचे आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडली आहे. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो, असे अनिल सिंग म्हणाले.

व्हॉट्सअॅपच्या चॅटवर आक्षेप घेता येणार नाही, कारण आमच्याकडे आरोपींचे ६५ ब प्रमाणे घेतलेले जबाब आहेत. त्या क्रुझवर पार्टीचे आयोजन केले होते आणि माझे अशील आरोपींना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी अटक केल्याचे सांगत आहेत. तो कोरडा दिवस होता म्हणून आम्ही त्यांना जाऊ द्यावे लागत होते, असे म्हणत अनिल सिंग यांनी आरोपींच्या वकिलांना टोला लगावला.

सिंग म्हणाले, आमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही, असा युक्तिवाद आरोपी करत आहे. पण, पंचनामा पाहिला तर अरबाजकडे ड्रग्ज सापडले आहेत. अरबाजने स्वतः आपल्या बुटातून ड्रग्ज काढून एनसीबीच्या स्वाधीन केले होते. आरोपी क्रुझवर ‘ब्लास्ट’ करण्यासाठी जात होते, असे चॅटमध्ये म्हटले आहे. क्रुझवर २ दिवसांसाठी सेवन करण्यासाठीच त्यांनी सोबत चरस बाळगले. ते अरबाजकडे सापडले.

Share post
Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Next Post

जळगावातील मोहाडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post
जळगावातील मोहाडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील मोहाडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group