Monday, April 6, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्थायी समिती सदस्यांच्या नामनिर्देशनपत्राला स्थगिती : न्यायालयाचे निर्देश

भगत बालाणींच्या याचिकेवर १७ नोव्हेंबर रोजी होणार अंतीम सुनावणी

by Divya Jalgaon Team
October 28, 2021
in जळगाव
0

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाच्या वादावरून भगत बालाणी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत कोर्टाने बंडखोर गटाच्या कथित गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचे नामनिर्देशन करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तर या प्रकरणाची १७ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाचा वाद न्यायालयात पोहचला आहे. पक्षाचे गटनेते भगत बालाणी हे असल्याने त्यांचा व्हीप स्थायी समिती सभापती आणि सदस्यपदांच्या निवडीत ग्राह्य धरण्यात यावा अशी भाजपची मागणी आहे. तर बंडखोर गटाने दिलीप पोकळे हे गटनेते तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे प्रतोद असतील असा ठराव करून त्या दृष्टीने स्थायी समितीसाठी नामनिर्देशनाची तयारी सुरू केली होती.

या पार्श्‍वभूमिवर, आपणच भाजपचे गटनेते आहोत या मागणीसाठी भगत बालाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावरील पहिल्या सुनावणीत कोर्टाने महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांना आपापले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आज या प्रकरणाची पुन्हा न्यायालयात सुनावणी झाली.

यात  दरम्यान, या प्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी अंतीम सुनावणी होणार असून तोवर दिलीप पोकळे यांनी स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करू नयेत असे स्पष्ट निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. यामुळे भगत बालाणी यांच्या याचिकेवरील निकालाच्या नंतरच स्थायीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share post
Previous Post

सुनील काळे यांना बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्काराने सन्मानित

Next Post

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Next Post
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group