जळगाव, प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कमी वयात विक्रमी कोट्यावधीचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून वरणगाव शहरात 24 बाय 7 अशी 25 कोटी ची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली व कार्यवंत सुद्धा करीत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य पुतळा भोगावती नदी शुशोभीरण वरणगाव चा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर परिसर विकास संपूर्ण शहरात रस्ते कोक्रेटिकरण फेव्हर ब्लॉक रस्ते गटार व्यायाम शाळा महात्मा जोतिबा फुले अण्णा भाऊ साठे स्वामी समर्थ मंदिर ग्रंथालय व्यापार संकुल गार्डन सार्वजनिक शौचालयसह कोट्यावधी ची कामे कामी वेळेत धडाडीने कामे उभी करून महराष्ट्रात आदर्श उभा केला याची प्रत्यक्ष पाहणी करून नोंद लोक सत्ता संघर्षं ने केली. माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आ. संग्राम जगताप, जलमित्र सचिन झावरे पाटील, डॉ. अलका कांबळे, शिक्षण महर्षी संदीप माळी यांच्या हस्ते सर्वात उत्कृष्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून सुनील काळे यांना अहमदनगर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्तिथी स्मृती चिन्ह प्रमाण पत्र 51 हजार राशी व शालश्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. पुरस्कार्थी म्हणून सुनील काळेंना मिळालेली 51 हजाराची रक्कम करोना काळात उध्वस्त झालेल्या कुटुंबाला तिथेच दिली.
माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा हा पुरस्कार जो मिळाला त्याचे श्रेय माझ्या तमाम रणगाव शहरातील 50 हजार जनतेचे आहे. यापुढे सुद्धा विकासात वरणगाव शहराला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर करणारच असा निर्धार करून सर्व सुख सुविधा युक्त विकास संपन्न मॉडेल शहर करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. उपस्तितांनी माजी नगराध्यक्ष यांच्या कमी वेळेत जास्त केलेल्या कामाचे कौतुक यावेळी केले.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस डॉ सादिक शेख, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजयुमो किरण धुंदे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, आय टी सेल प्रमुख मयुर गावंडे, विक्की चांदेलकर, शहरउपाध्यक्ष पप्पू ठाकरे, शंकर पवार आदींची उपस्थिती होती.