चोपडा, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्याने ,त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात जळगाव जिल्हा काँग्रेसची यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडली. त्याबद्दल त्यांचा चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
24 ऑक्टोबर 2021 रोजी चोपडा शहर व तालुका काँग्रेसची मासिक मीटिंग कस्तुरबा हायस्कूल चोपडा येथे संपन्न झाली. यावेळी एडवोकेट संदीप पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. काँग्रेसच्या पडतीच्या काळात काँग्रेसचे काम करणे म्हणजे एक दिव्य होते. ही दिव्यत्वाची कसोटी पार करून सात वर्षात जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण केला. काँग्रेसतर्फे विविध आंदोलने यशस्वीरित्या पार पाडलीत. संपूर्ण जळगाव जिल्हा पिंजून काढला. काँग्रेसला जिल्ह्यात प्रभावी केले. त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर सुरेश शामराव पाटील, चोपडा मार्केट कमिटीचे मा. व्हाईस चेअरमन नंदकुमार सांगोरे, काँग्रेस देते नेते अजहर दादा, मुक्तार भाई ,रमेश तात्या पाटील, प्रदीप पाटील, श्री कावेरी, श्री रमाकांत सोनवणे, चेतन बाविस्कर, के. डी. चौधरी यांची गौरव पर भाषणे झालीत. संदीप पाटील म्हणजे शांत संयमी आणि खंबीर नेतृत्व असून त्यांना राज्याच्या काँग्रेस कमिटी वर सन्मानाचे पद देऊन सन्मानित करावे असा एकमुखी ठराव यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला .यासाठी पुढील कार्यवाहीसाठी डॉक्टर सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली चोपडा शहर व तालुका काँग्रेस वरिष्ठांकडे जाणाऱ असल्याचेही यावेळी ठरविण्यात आले. यावेळी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले. काँग्रेस चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज असून जवळजवळ 50 कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले. सर्व पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाऊन मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला .यावेळी लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडण्याचा जो प्रकार झाला त्याचा निषेध करण्यात आला. काँग्रेस नेत्या श्रीमती प्रियंका गांधी यांना योगी सरकारच्या पोलिसांनी जी असभ्य वागणूक दिली, त्याचा निषेध धिक्कार करण्यात आला. केंद्र सरकारने केलेल्या तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी करून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. यावेळी अनेकांनी एडवोकेट संदीप पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला कोरोना काळात काँग्रेसचे पितामह डॉक्टर सुरेश दादा पाटील, राजाराम बापू पाटील, विनायक बापू पाटील ,अबरार जागीरदार याना अभिवादन करण्यात आले. कोरोना काळात ज्ञात-अज्ञात अशा ज्या व्यक्ती निघून गेल्या त्या सर्वांना अभिवादन करण्यात आले. दादाजी श्री गिरी पुरी जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे मासिक झेंडावंदन यावेळी करण्यात आले .डॉक्टर सुरेश पाटील यांचे शुभहस्ते झेंडा फडकविण्यात आला. यावेळी देवआनंद शिंदे, एडवोकेट एस डी पाटील, देवकांत चौधरी, प्राध्यापक शैलेश वाघ, एडवोकेट जैन, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, कांतीलाल सनेर ,मोरे सर, मुन्ना फकीर, सलीम खान, हमीद मिस्तरी ,श्याम शिंपी, रवींद्र मराठे, इल्यास पटेल ,आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार श्री के. डी. चौधरी यांनी मानले. श्री नंदकिशोर सांगोडे यांनी सूत्रसंचालन केले.