जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र अरुण चांगरे यांची महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगचे उपाध्यक्ष पदी किंवा सदस्यपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राजकीय,सामाजिक व कामगार संघटनेमध्ये २५ वर्षांपासून सक्रिय असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.