जळगाव, प्रतिनिधी । नेशन बिल्डर अवॉर्ड 2021 या कार्यक्रमा अंतर्गत रोटरी क्लब जळगांव यांनी शिक्षक दिन आणि नवरात्र व सातवी माळ म्हणजेच सरस्वती पूजन याचे औचित्य साधून 18 शिक्षिकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सत्कार केला.
या समारंभात आशा भालचंद्र पाटील जळगांव, राजश्री रविराज पगार जळगांव, आकांक्षा रोहिदास निकम जळगांव, ज्योती जगन्नाथ पाटील जळगांव, सपना महेश रावलांनी जळगांव, सोनाली दत्तात्रय साळुंखे नशिराबाद, अरुणा सुधीर नेहते नशिराबाद, छाया भास्करराव पाटील जळगांव, लीना सुरेश आहिरे भुसावळ, कांचन सुरेश पाटील जळगांव, विद्या प्रभाकर खाचणे असोदा, ज्योती धनंजय पवार कानळदा, चारूलता पाटील जळगाव, ज्योती गोसावी जळगांव, पूनम रमेश बोन्डे जळगांव, ज्योती लीलाधर राणे साळवा, मोनिका विजय चौधरी व जयश्री प्रमोद नेहते जळगांव यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार केला. नवरात्रात पुरस्कार द्यायचे ठरवल्यावर नवं दुर्गा स्वरूप म्हणून 18 महिला शिक्षकांची निवड केली गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. सी. डी. पाटील सरांनी केले व प्रस्तावना आणि पुरस्काराचे महत्व पास्ट प्रेसिडेंट रो. डॉ. तुषार फिरके यांनी सांगितले. सरस्वती वंदना आणि स्वागत गीत ज्योती लीलाधर राणे यांनी सादर केले. पुरस्कार वितरणा नंतर 3 शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त करुन अजून जोमाने या क्षेत्रात काम करू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. देवांग (उप शिक्षण अधिकारी झे पी जळगाव ), पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. चंद्रशेखर सीकची व अध्यक्ष रो. संदीप शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन पास्ट प्रेसिडेंट रो. केदारजी मुंदडा यांनी केले. सदर कार्यक्रमाला पास्ट प्रेसिडेंट रो. डॉ. जयंत जहागीरदार, पास्ट प्रेसिडेंट जितेंद्र ढाके, रो. स्वाती ढाके, रो. काजल फिरके, पास्ट प्रेसिडेंट रो. कॅप्टन मोहन कुलकर्णी यांची आवर्जून उपस्थिती होती.