Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कपाशीवरील गुलाबी बोड अळीचे व्यवस्थापन

by Divya Jalgaon Team
November 3, 2020
in जळगाव
0
कपाशीवरील गुलाबी बोड अळीचे व्यवस्थापन

जळगाव – विदर्भातील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चर्चेनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 टक्क्यांपर्यंत होता.

परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाडयात तो 15 ते 20 टक्के झाला. नोव्हेंबर महिन्यातील वातावरण गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सद्यपरिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक किंवा दोन वेचण्या झालेल्या आहे. काही ठिकाणी कापसाच्या झाडाला 10 ते 15 बोंडया तर कुठे 50 ते 60 बोंडया आहेत. ज्याठिकाणी कापसाला कमी बोंडे असुन बोंड पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन फवारणीचा निर्णय घ्यावा.

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंड तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढरक्या रंगाच्या लहान अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खाली सांगितल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी,

जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्कयां दरम्यान आहे अशा ठिकाणी सायपरमेथ्रिन 10 टक्के ईसी 8 मिली किंवा सायपरमेथ्रिन 25 ईसी 3.5 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 ईसी 10 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 2.8 ईसी 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तिसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी दिसुन आल्यास हि अळी तीन ते चार दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10 ते 15 दिवसांनी कोषातील पतंग निघुन अंडे टाकण्यास सुरुवात करु शकतात व गुलाबी बोंड अळीच्या दुसऱ्या पिढीच्या प्रादुर्भावास सुरुवात होऊ शकते. अशाठिकाणी वरीलप्रमाणे किटकनाशकाची फवारणी करुन पतंगाच्या व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळयांचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. असे विभागप्रमुख, किटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: Jalgaon Latest NewsJimaka Newsकपाशीवरील गुलाबी बोड अळीचे व्यवस्थापन
Previous Post

निर्यातक्षम पिकांची हॉटीनेट प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

जळगाव – पुणे – इंदूर विमानसेवेला मंजुरी

Next Post
अटल भुजल योजनेत अमळनेर, पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश

जळगाव - पुणे - इंदूर विमानसेवेला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group