जळगाव – जळगाव जनता सहकारी बँकेच्या सिंधी कॉलनी, जळगाव शाखेचा ४था वर्धापनदिन आज रोजी उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी शाखेचे पालक संचालक सुरेश केसवाणी, संचालक सतीश मदाने, संचालिका डॉ. सौ आरती हुजुरबाजार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, कर्मचारी प्रतीनिधी हेमंत चंदनकर, शाखाधिकारी सौ विनया कुलकर्णी, कर्मचारी वृंद तसेच केशवस्मृति प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य योगेश्वर गर्गे सपत्नीक उपस्थित होते. शाखेच्या ग्राहकांनी याप्रसंगी उपस्थित राहून शाखेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वर्धापनदिनाच्या अनुषंगाने शाखेत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच याप्रसंगी २० खातेदारांना सुमारे ९१ लाख ५० हजारांचे कर्ज मंजुरीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या शाखेचा एकत्रित व्यवसाय २९.११ कोटींचा आहे तसेच शाखेच्या वतीने RTGS/NEFT, लॉकर, सोने तारण कर्ज यासह विविध सुविधा ग्राहकांसाठी बँकेतर्फे उपलब्ध आहेत.